Ad will apear here
Next
रत्नागिरीतील आनंदीबाई अभ्यंकर बालकमंदिरात गणेशोत्सव उत्साहात सुरू


रत्नागिरी :
दी न्यू एज्युकेशन सोसायटीच्या आनंदीबाई प. अभ्यंकर बालकमंदिरात ३० ऑगस्टपासून गणेशोत्सवाला सुरुवात झाली. ढोल-ताशांच्या गजरात लाडक्या बाप्पाचे आगमन झाले. 

लहान मुलांना भारतीय संस्कृतीतील सण-उत्सव कळावेत, त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावेत या हेतूने शाळेत विविध सण साजरे केले जातात. लाडक्या गणपतीबाप्पाला आणताना मुलांनी लेझीमचा आनंद लुटला. खेळघर, तसेच छोट्या आणि मोठ्या शिशुवर्गातील मुलांनी यात भाग घेतला. 

मुख्याध्यापिका मीना रिसबूड यांनी बाप्पांचे स्वागत केले. नंतर एका वर्गामध्ये रोषणाईसह सुंदर आरास करून बाप्पांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. बाप्पांसाठी नैवेद्य म्हणून मोदकासह जिलबी आणि विविध गोडधोड पदार्थ आणण्यात आले. मुलांनी गणपती, शंकर आणि अन्य देवांच्या आरत्या तालासुरात म्हटल्या. मराठी गणपती स्तोत्र, श्लोक त्यांनी म्हटले आणि गणपतीचा नामजपही केला.

शाळेतील उत्सव दोन दिवस साजरा होणार आहे. यानिमित्त मुलांनी शाडूच्या मातीपासून बाप्पाच्या अनेक लहान-लहान मूर्ती, फळे आणि विविध वस्तू बनवल्या. या हस्तकला वस्तूंचे प्रदर्शन शाळेत भरवण्यात आले आहे. शाळा व्यवस्थापक राजीव गोगटे, बालकमंदिरच्या सर्व शिक्षिका, सेविकांनी उत्सव चांगल्या पद्धतीने पार पडण्यासाठी मेहनत घेतली. 

(व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.)









 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/YZOYCD
Similar Posts
बालगोपाळांनी केले श्री गणेशाचे स्वागत! रत्नागिरी : दी न्यू एज्युकेशन सोसायटीच्या आनंदीबाई परशुराम अभ्यंकर बालकमंदिरात सोमवारी (१० सप्टेंबर २०१८) बालगोपाळांनी लाडक्या गणेशाचे उत्साहात स्वागत केले. त्याच्या आगमनामुळे बालदोस्तांनी जल्लोष केला. गणेशाची आगमन मिरवणूक शाळेच्या आवारात काढण्यात आली. लेझीम खेळत, ताशा- झांज वाजवत छोट्या मुले मिरवणुकीत सहभागी झाली होती
अभ्यंकर बालकमंदिरमध्ये दहीहंडी उत्सव साजरा रत्नागिरी : आनंदीबाई परशुराम अभ्यंकर बालकमंदिरमध्ये शुक्रवारी (२३ ऑगस्ट) दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. कृष्ण व राधेच्या पारंपरिक वेशभूषेमध्ये बालगोपाळांनी ‘गोविंदा रे गोपाळा’ गीतावर नृत्य सादर केले.
आनंदीबाई अभ्यंकर बालकमंदिरात दहीहंडी रत्नागिरी : दी न्यू एज्युकेशन सोसायटीच्या आनंदीबाई परशुराम अभ्यंकर बालकमंदिरात एक सप्टेंबर २०१८ रोजी दहीहंडीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी बालगोपाळ पारंपरिक वेशभूषेत सजून आले होते.
अभ्यंकर बालकमंदिरात बालवारकऱ्यांची दिंडी रत्नागिरी : ‘विठ्ठल विठ्ठल गजर करू या, आली आली एकादशी, चला जाऊ पंढरीसी, माऊली माऊली’ असा जयघोष गुरुवारी (११ जुलै) रत्नागिरीतील दी न्यू एज्युकेशन सोसायटीच्या आनंदीबाई प. अभ्यंकर बालकमंदिरात ऐकू येत होता.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language